Monday, August 25, 2008

श्री साईबाबांची अकरा वचने

शिरडीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे ॥ १ ॥
माझ्या समाधीची पायरी चढेल । दु:ख हे हरेल सर्व त्याचे ॥ २ ॥
जरी हे शरीर गेलो मी टाकून । तरी मी धावेन भक्तासाठी ॥ ३ ॥
नवसास माझी पावेल समाधी । धरा द्रुढ बुध्दी माझ्या ठायी ॥ ४ ॥
नित्य मी जिवंत,जाणा हेंची सत्य । नित्य घ्या प्रचीत अनुभवे ॥ ५ ॥
शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा ॥ ६ ॥
जो जो,मज भजे,जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे,मीही त्यासी ॥ ७ ॥
तुमचा मी भार वाहीन सर्वथा । नव्हे हे अन्यथा वचन माझे ॥ ८ ॥
जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस । मागे जे जे त्यास ते ते लाभे ॥ ९ ॥
माझा जो जाहला कायावाचामनीं । तयाचा मी रुणी सर्वकाळ ॥ १० ॥
साई म्हणे तोची तोची झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी ॥ ११ ॥

Tuesday, August 19, 2008

भारत देश मागे का पडलाय?...

... आपली लोकसंख्या आहे १०० कोटी

त्यातले ७.९० कोटी लोक रिटायर्ड आहेत

३० कोटी राज्य सरकारी नोकरीत

१७ कोटी केंद सरकारच्या चाकरीत

( दोन्हीही काम करत नाहीत)

एक कोटी लोक आयटी उद्योगात आहेत

( ते काम करतात, पण भारतासाठी नव्हे)

२५ कोटी शाळकरी मुले आहेत

दोन कोटी तर पाच वर्षांखालची बालके आहेत

१५ कोटी बेरोजगार आहेत

१.२ कोटी हॉस्पिटलात अॅडमिट असतात

७९,९९,९९८जण तुरुंगात आहेत

उरले दोघे...

म्हणजे तुम्ही आणि मी...

तुम्ही SCRAP वाचण्यात वेळ घालवताय...

मी एकटाच देशाचा गाडा कसा हाकू?!!!!!

कहाणी ही एका वेडया मनाची

वाळुवर बनवलेली
दोन घरं मी स्वत:ची
एक ते लाटेत कोलमडलं
आणि दुसरं ते वाहुण गेलं
काय दोष द्यावा त्या लाटेला ?
वाळुवर घर बनवणं
ही गोष्ट्च मुळ चुकीची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

श्रावणात बहर आला
अख्या रानाला पण
एक कळीही ना
उमलली माझ्या अंगणाला
माझ्या अंगणात होते
हिच चुक का त्या रोपांची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

चमकत्या त्या वस्तुला
मी नेहमीच सोनं मानलं
समजाऊनही न बदलली
नितीमत्ता माझी
हाव होती तेव्हा मला
त्या चमकत्या सोन्याची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

आता सगळं संपलय,
उठलाय सगळा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
मजेत आता माळ आसवांची
कहाणी ही एका वेडया मनाची....................!

पाहतोय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार
नाही कुणाच्या वाटही साथीची
कहाणी ही एका वेडया मनाची

मैत्रीचं नातं

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

हितचिंतक..

एकदा मी माझ्या तंद्रित चाललो होतो.एक वळनाशी येउन पुढचे पाउल टाकणार तोच आवाज आला,थांब!एक पाउलहि पुढे टाकू नकोस.वरची बाल्कनी तुझ्या डोक्यावर पडेल."मी थांबलो,अन काय आचर्य खरेच वरुण एक आखिच्याआखी बाल्कनी माझ्या पुढ्यात पडली.मी मागे वलून पाहिले,तिथे कुणीच नव्हते.आजुबाजुची लोंक अपघात पहायला पुढे धावली होती.त्यात कुणीही माझ्याकडे पाहत नव्हता.असेच काही दिवस गेले.मी रस्त्याने चाललो होतो हातात खरेदी केलेल्या कपड्याच्या पिशव्या होत्या.मी रस्ता क्रॉस करणार तोच मला पुन्हा त्यादिवाशिचा आवाज ऐकू आला."थांब.एक पाउलहि पुढे टाकू नकोस.एक ट्रकचा ताबा सूटलाय अन तो लाल दिवा तोड़नार आहे."अन खरच काही क्षणातच माझ्या समोर एक ट्रक भरधाव वेगाने सिग्नल तोडून गेला.मी हडबडलो." तू कोण आहेस?"मी जोरात म्हणालो पण कुणीच उत्तर दिले नाही.पण तो आवाज माझ्या मनाचा वाटत होता.मी मनातच विचारलं,"तू कोण आहेस?"तो म्हणाला,"तुझा मित्र,हितचिंतक!"मी डोळ्यात पाणी आणून म्हणालो,"Thank you"मी रडत रडत त्याला प्रश्न केला,"खुप उशिरा भेटलास!मी लग्न करताना कुठे होतास?"तो रागात म्हणाला,"तो भटजी म्हणजे मीच होतो नि तुला सांगत होतो,"सावधान"!पण...तू कुठे एकतो...

मैत्री

काय जादू असते या मैत्रीत !
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन् श्वास
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच शिंपले...
विविध रंगांचे, विविध आकारांचे, विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा
लगद उघडावा
अन् त्यात मोती सापडावा
खर्राखुर्रा, तुझ्यासारखा
खरं सांगू का !
मोतीसुद्धा लाभावा लागतो
तुझ्यासारखा....!

आम्ही मराठी आहोत

आम्ही मराठी आहोत कारण 31st december ला दणक्यात celebration केलं तरीगुढीपाडव्याला घरावर गुढी ऊभारून जीभेवरकडू-गोड गोळी ची चव चाखत मनापासून नवीन वर्षाचं स्वागत करतो..आम्ही मराठी आहोत कारण कॉलेज मधून येताना टाइमपासमंचुरियन खाऊन आलो तरी वरण भात आणि साजूक तुपाशिवाय माझं भागत नाही..आम्ही मराठी आहोत कारण रिकी मार्टिन च्या गाण्यावर माझे पाय थिरकलेतरी बाबूजींचे 'तोच चंद्रमा नभात' ऐकल्यावर नकळतच तोंडातून 'वाह' निघून जातं..आम्ही मराठी आहोत कारण frnds सोबत cool outfits घालून धम्माल पार्टी केली तरी..आम्ही मराठी आहोत कारण कितीही imported cosmetics- perfumes वापरले तरी त्या typical sandal साबणा शिवाय आणि उटण्या शिवायआमची दिवाळी साजरी होऊच शकत नाही..आम्ही मराठी आहोत कारण वर्तमानपत्रांनी कितीही कृत्रिम रंगाविषयी लिहिलं तरीदिवसभर मनसोक्त रंग खेळल्याशिवाय एकही होळी जात नाही..आम्ही मराठी आहोत कारण प्रवासाला जाताना गाडीतून एखादं मंदिर दिसलं की नकळतच आमचे हात जोडले जातात.......... जय महाराष्ट्र!...